

निपाणी (वार्ता) : निपाणी येथील चिमगांवकर गल्ली,बागवान गल्ली येथील विठ्ठल मंदिरात आयोजित अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची दिंडी प्रदक्षिणा आणि महाप्रसाधने सांगता झाली. त्यानिमित्त आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
महादेव केसरकर यांच्या हस्ते ध्वजपूजन व ध्वजारोहण, बाबुराव महाजन -महाराज यांच्या हस्ते वीणा पूजन आणि शंकर महाराज -हिरेमठ यांच्या हस्ते अधिष्ठान पूजन करून तुकाराम सुतार महाराज ग्रंथ पूजनाने सोहळ्यास प्रारंभ झाला होता. सोहळ्याच्या निमित्ताने पांडुरंग व्हटकर यांनी एलईडी स्क्रोलिंग बोर्ड मंदिरास अर्पण केला. मदन माळी-कुर्ली, रोहन निकडे यांनी ज्ञानेश्वरीच्या ५१पारायण प्रती अर्पण स्वरूपात दिल्या. सोहळा काळात प्रवचन, किर्तन आयोजित केले केले होते. काल्याचे किर्तन व महाप्रसादाने सोहळ्याची सांगता झाली.
यावेळी समाधी मठातील प्राणलिंग स्वामी, मल्लिकार्जुन स्वामी, श्रीमंत दादाराजे निपाणकर-सरकार, महालिंग कोठीवाले, वज्रकांत सदलगे, सुनील आंबले, अभिनंदन मुदकुडे, अभिनंदन भोसले यांच्यासह भावी उपस्थित होते.


Belgaum Varta Belgaum Varta