Sunday , September 20 2026
Breaking News

तारांगणचा कलाविष्कार कार्यक्रम शनिवारी

Spread the love

 

बेळगाव : महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून देणारे व त्यांच्या विकासासाठी कार्यरत असलेले तारांगण, निधी कामत, नेत्रा मेणसे, डॉ. प्रा. मनीषा नाडगौडा यांच्यावतीने कलाविष्कार कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम शनिवार दिनांक 5 सप्टेंबर 2026 रोजी दुपारी 2.30 वाजता महात्मा फुले रोडवरील दैवज्ञ मंगल कार्यालय या ठिकाणी आयोजित केला आहे. या कार्यक्रमात पारंपारिक मंगळागौर खेळ, भारुड, ओवी सादरीकरण, फॅशन शो अशा जुन्या आणि आधुनिक काळातील संस्कृतीचे दर्शन बेळगावकरांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून पहावयास मिळणार आहे. या कार्यक्रमात श्री कालिका देवी मंगळागौर ग्रुप, क्रांती महिला मंडळ, योगा महिला मंडळ, सविता मंगळागौर ग्रुप, श्री धनलक्ष्मी मंगळागौर ग्रुप, स्कायवर्ल्ड एव्हिएशन अकॅडमी, श्री सरस्वती इन्फोटेक आपल्या समूहातर्फे सादरीकरण करणार आहेत. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून एमपी म्युचल फंड डिस्ट्रीब्यूटर निधी कामत, सामाजिक कार्यकर्त्या नेत्रा मेणसे, साहित्यिका डॉ. प्रा. मनीषा नाडगौडा, उद्योजिका पुनम हंगीरगेकर, दैवज्ञ मंगल कार्यालयाचे सचिव मंजुनाथ सेठ उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमास जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित रहावे असे आयोजकांनी कळवले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *