
बेळगाव : जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज (दक्षिणपीठ, नाणीजधाम) यांच्या कृपाशीर्वादाने आणि पीठाचे उत्तराधिकारी प. पू. कानिफनाथ महाराज यांच्या दिव्य प्रेरणेने श्रावण मासानिमित्त येळ्ळूर सेवा केंद्राच्या वतीने एकदिवसीय ‘श्री लीलामृत’ ग्रंथ सामुदायिक पारायण सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला.
येळ्ळूर सेवा केंद्रातील ब्रह्मदेव मंदिरात आयोजित या धार्मिक सोहळ्याची सुरुवात सेवा केंद्राचे अध्यक्ष पुंडलिक धामणेकर यांच्या हस्ते जगद्गुरु श्रींच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर पारायणाचा संकल्प करण्यात आला आणि सामुदायिक पारायणास प्रारंभ झाला.
दिवसभर भाविकांनी भक्तिभावाने ग्रंथाचे सामुदायिक पारायण केले. मंदिर परिसरात निर्माण झालेल्या भक्तिमय वातावरणात सोहळा उत्साहात पार पडला. अखेरीस श्रींच्या सांगता आरतीने पारायण सोहळ्याची विधिवत सांगता करण्यात आली.
या सोहळ्यास आध्यात्मिक प्रमुख सागर हुंदरे, जिल्हा महिला अध्यक्ष शांता इंचल, तालुका महिला अध्यक्ष सुनंदा आनंदाचे, तालुका देणगी प्रमुख लक्ष्मण नौकूडकर, तालुका अध्यक्ष महादेव पाटील यांच्यासह धामणे, येळ्ळूर, पीरनवाडी, मजगाव, बामनवाडी, सांबरा, कुद्रेमनी, वडगाव, खानापूर आणि क. नंदगड येथील सेवा केंद्रांचे पदाधिकारी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta