
बेळगाव : केळकर बाग येथील प्रसिद्ध ‘बेळगावचा कैवारी’ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या रौप्य महोत्सवी अर्थात २५व्या वर्षानिमित्त गणेशोत्सव मंडपाचा मुहूर्त मेढ सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यंदाचा गणेशोत्सव २५वे वर्ष असल्याने हा सोहळा विशेष भव्य-दिव्य पद्धतीने साजरा करण्याचा निर्धार मंडळाच्या वतीने करण्यात आला आहे.
मंडप मुहुर्त मेढ सोहळ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रथमेश परेश शिंदे, उपाध्यक्ष आदित्य मुतगेकर, खजिनदार संजय गवाडे, सचिव दीपक ओझा आणि जनरल सेक्रेटरी परेश शिंदे यांच्यासह मंडळाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी प्रकाश उसुलकर, गुरुनाथ किरमटे, ज्योतिबा उसुलकर, गणपत उसुलकर, राजू लासे, आकाश मन्नूरकर, वैभव धामणेकर, माऊली महिला मंडळ, प्राजक्ता शिंदे, कल्पना उसुलकर, आरती ओझा, श्री. कासळकर, संजय पाटील यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘बेळगावचा कैवारी’च्या २५व्या वर्षाचा हा रौप्य महोत्सव अविस्मरणीय आणि भव्य स्वरूपात साजरा करण्याचा संकल्प मंडळाने केला असून, यानिमित्त वर्षभर विविध धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि मनोरंजनात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
गेल्या २५ वर्षांपासून गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक एकोपा, सांस्कृतिक परंपरा आणि भक्तीची ज्योत अखंड तेवत ठेवणाऱ्या ‘बेळगावचा कैवारी’ मंडळाच्या रौप्य महोत्सवी वर्षाकडे बेळगावकरांचे विशेष लक्ष लागले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta