
बेळगाव : सराईतपणे दुचाकी चोरी करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात मूडलगी पोलिसांना यश आले असून, त्याच्याकडून सुमारे २ लाख रुपये किमतीच्या चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
मूडलगी शहरातील वीरभद्रेश्वर मंदिराजवळून दुचाकी चोरीला गेल्याच्या प्रकरणाचा तपास करताना मूडलगी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. या प्रकरणात सुभाष शिवनप्पा रेड्डेरट्टी (वय ३४) याला अटक करण्यात आली आहे.
पीएसआय वाय. एस. बिसनाळ यांच्या नेतृत्वाखालील तपास पथकाने यशस्वी कारवाई करत आरोपीला मूडलगी-मसगुप्पी मार्गावरील एपीएमसी प्रवेशद्वाराजवळ ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीकडून चोरीच्या चार दुचाकी वाहनांचा शोध घेण्यात आला असून, त्यांची एकूण किंमत सुमारे २ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणाचा यशस्वी छडा लावणाऱ्या पोलीस पथकाचे वरिष्ठ अधिकारी तसेच नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे.

Belgaum Varta Belgaum Varta