Sunday , September 20 2026
Breaking News

विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीचा हात; गोडसे शैक्षणिक निधीतर्फे ३७ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

Spread the love

 

बेळगाव : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने श्री. खेमाजीराव तुकाराम गोडसे शैक्षणिक निधी (ट्रस्ट) यांच्या वतीने आयोजित शैक्षणिक बक्षीस वितरण समारंभ सोमवार, दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी सह्याद्री मल्टीस्टेट पतसंस्था, महिला विद्यालयाजवळ, बेळगाव येथे उत्साहात पार पडला. यावेळी ३७ गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षिसे देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमास बी.के. मॉडेल हायस्कूल, बेळगावचे निवृत्त मुख्याध्यापक श्री. के. एल. मजुकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले.

यावेळी श्री. के. एल. मजुकर, डॉ. अजय काळे आणि डॉ. सुचिता भोसले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे, तर जीवनातील विविध क्षेत्रांतही आपले कर्तृत्व सिद्ध करावे. त्यासाठी सातत्य, कठोर मेहनत, शिस्त आणि सकारात्मक दृष्टिकोन आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. परिस्थिती कोणतीही असो, ध्येय निश्चित करून प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यास यश निश्चित मिळते, असा संदेशही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

कार्यक्रमास मुख्य ट्रस्टी श्री. संग्राम चंद्रकांत गोडसे, उपमुख्य ट्रस्टी श्रीमती शशिकला पाटील, श्री. विनोद सदाशिवराव भोसले, श्री. शिवाजीराव निळकंठराव हंडे, डॉ. स्मिता काळे, सौ. स्मिता घाटगे तसेच फलटणहून आलेले श्री. किशोर शिवाजीराव गोडसे आदी मान्यवर उपस्थित होते. ज्येष्ठ ट्रस्टी श्री. अप्पासाहेब गंधाडे प्रकृती अस्वास्थ्यामुळे कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाहीत.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. प्रभाकर पाटील यांनी केले. गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. या उपक्रमामुळे विद्यार्थी, पालक आणि उपस्थित मान्यवरांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *