Sunday , September 20 2026
Breaking News

मालमत्तेच्या वादातून बाप-लेकीची ग्राम पंचायत आवारात निर्घृण हत्या

Spread the love

 

कित्तूर तालुक्यातील आवरादी गावातील थरारक घटना; कारचालक गंभीर जखमी

बेळगाव : मालमत्तेच्या वाटणीवरून कुटुंबात सुरू असलेल्या वादाचा शेवट बुधवारी बाप-लेकीच्या निर्घृण हत्येत झाला. कित्तूर तालुक्यातील आवरादी गावातील ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात माजी सैनिक रुद्राप्पा कुंदरगी (६७) आणि त्यांची मुलगी शशिकला कुंदरगी (२६) यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला करून त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रुद्राप्पा कुंदरगी आणि त्यांच्या भावांमध्ये मालमत्तेच्या वाटणीवरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. बुधवारी जमिनीच्या कागदपत्रांशी संबंधित कामासाठी रुद्राप्पा हे ग्रामपंचायतीत आले होते. त्यांची मुलगी शशिकला आणि कारचालकही त्यांच्यासोबत होते.

रुद्राप्पा ग्रामपंचायतीत आल्याची माहिती मिळताच त्यांचे भाऊ बसाप्पा कुंदरगी, संगाप्पा कुंदरगी तसेच संगाप्पा यांचा मुलगा मडिवाळप्पा कुंदरगी तेथे आले. यावेळी दोन्ही बाजूंमध्ये वाद झाल्यानंतर आरोपींनी कुऱ्हाड, कुऱ्हाडीसदृश धारदार हत्यारे व कोयत्याने रुद्राप्पा यांच्यावर हल्ला केला. ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारातच त्यांची हत्या करण्यात आली.

वडिलांवर हल्ला होत असल्याचे पाहून त्यांना वाचवण्यासाठी पुढे आलेल्या शशिकला यांच्यावरही हल्लेखोरांनी हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. शशिकला हिच्यावरही कोयत्याने हल्ला करण्यात आल्याचे वृत्त आहे.

३८ गुंठे जमिनीच्या वाटणीवरून वाद

३८ गुंठे जमिनीच्या वाटणीवरून कुटुंबात सुरू असलेल्या वादाचे पर्यवसान दुहेरी हत्येत झाल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. या हल्ल्यात रुद्राप्पा यांचा कारचालकही गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच कित्तूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणाचा पुढील तपास कित्तूर पोलीस ठाण्याकडून सुरू आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *