Sunday , September 20 2026
Breaking News

सीमाप्रश्नी आजची सुनावणी टळली; आता पुढील तारखेची प्रतीक्षा

Spread the love

नवी दिल्ली : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात बुधवारी (दि. १६) अपेक्षित असलेली सुनावणी पुन्हा होऊ शकली नाही. गेल्या आठवड्यातील सुनावणीही पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर महाराष्ट्राचे ॲडव्होकेट ऑन रेकॉर्ड शिवाजीराव जाधव यांनी प्रकरण पुन्हा मेन्शन केले होते आणि त्यानुसार १६ सप्टेंबर रोजी सुनावणी निश्चित झाली होती.

मात्र, बुधवारी संबंधित खंडपीठासमोर इतर प्रकरणांची संख्या अधिक असल्याने सीमाप्रश्नाचा दावा सुनावणीसाठी आला नाही. त्यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरील पुढील सुनावणीची तारीख आता निश्चित होणे बाकी आहे.

यासंदर्भात ॲडव्होकेट ऑन रेकॉर्ड शिवाजीराव जाधव यांनी लवकरच पुढील तारीख निश्चित होईल, अशी माहिती दिली. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर १६ सप्टेंबरसाठी विविध खंडपीठांच्या सुनावणी व सूचीबाबतच्या नोंदी उपलब्ध आहेत.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *