Sunday , October 4 2026
Breaking News

भारत विकास परिषदेतर्फे “गुरु वंदना – छात्र अभिनंदन” कार्यक्रम

Spread the love

 

बेळगाव : भारत विकास परिषदेतर्फे ‘गुरु वंदना – छात्र अभिनंदन’ कार्यक्रम संत मीरा शाळेच्या माधव सभागृहात रविवारी सायंकाळी अपूर्व उत्साहात पार पडला. या विशेष कार्यक्रमांतर्गत विविध शाळांच्या 25 उत्कृष्ट शिक्षकांना मानपत्र, शाल व स्मृतिचिन्ह देऊन खास सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे 50 विद्यार्थी-विद्यार्थिनींनाही यावेळी उत्कृष्ट छात्र पुरस्कार देऊन विशेष गौरविण्यात आले. मुख्य अतिथी म्हणून आमदार अभय पाटील उपस्थित होते. उद्योजक चंद्रशेखर इटी आणि ओमेगा ऑफसेटचे रफीक हिराणी हे गौरव अतिथी म्हणून उपस्थित होते.
प्रारंभी सामूहिक संपूर्ण वंदे मातरमने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मान्यवरांच्या हस्ते भारतमाता व स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमांचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. भारत विकास परिषदेचे अध्यक्ष विनायक मोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. राष्ट्रीय महिला कार्यकारिणी सदस्या स्वाती घोडेकर यांनी परिषदेच्या निःस्वार्थ सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक सेवाकार्याची माहिती दिली.
त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ट शिक्षकांना सन्मानपत्र, शाल व स्मृतिचिन्ह तसेच उत्कृष्ट विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रतिभा हल्लेप्पनवर यांनी केले. प्रिया पाटील आणि जया नायक यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. प्रांत संघटन सचिव विनायक घोडेकर यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
शहरातील प्रमुख शाळांचा यामध्ये सहभाग होता. यामध्ये ज्योती सेंट्रल स्कूल, के. एल्. एस्. स्कूल, लव्ह डेल सेंट्रल स्कूल, ज्ञान प्रबोधन मंदिर, सरस्वती गर्ल्स हायस्कूल, जी. जी. चिटणीस इंग्लिश माध्यम स्कूल, बालिकादर्श विद्यालय, ठळकवाडी हायस्कूल, एम् . व्ही. हेरवाडकर स्कूल, बी. के. मॉडेल हायस्कूल, उषाताई गोगटे हायस्कूल, व्ही. एन्. शिवणगी स्कूल, अमृता विद्यालयम्, संत मीरा इंग्लिश माध्यम स्कूल अनगोळ, एम्.व्ही.एम्. प्रभाताई देशपांडे इंग्रजी माध्यम स्कूल, महिला विद्यालय मराठी माध्यम हायस्कूल, संत मीरा स्कूल हिंडलगा, व्ही. एम्. शानभाग हायस्कूल, एम्. आर. भंडारी स्कूल, स्वाध्याय विद्यामंदिर, भरतेश इंग्रजी माध्यम स्कूल, मुक्तांगण विद्यालय, व्ही.बी.एस.एस. हायस्कूल, शारदा विद्यालय, जीवनज्योती इंग्रजी माध्यम स्कूल या शाळांमधून निवडलेले शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी भारत विकास परिषदेचे प्राचार्य व्ही. एन्. जोशी, डी. वाय. पाटील, विनायक घोडेकर, पांडुरंग नायक, सुहास गुर्जर, डॉ. जे. जी. नाईक, विजेंद्र गुडी, रामचंद्र तिगडी, पी. एम्. पाटील, पी. जे. घाडी, ॲड. बना कौजलगी, विद्या इटी, रजनी गुर्जर, अक्षता मोरे, मंगल कुलकर्णी, निमंत्रित, शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

प्रा. आर. एस. पाटील यांची ‘Achievers of Karnataka’ पुरस्कारासाठी निवड

Spread the love  खानापूर : शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्यरत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *