Friday , November 6 2026
Breaking News

मुंबईमध्ये देखील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने काळा दिवस

Spread the love

 

बेळगाव, बिदर, भालकीसह सीमाभाग महाराष्ट्रात समाविष्ट करण्याच्या घोषणा

मुंबई : आज १ नोव्हेंबर २०२६ रोजी मुंबईतील करी रोड नाक्यावर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने फलक दाखवून कर्नाटक सरकारच्या विरोधात काळा दिवस पाळण्यात आला.

यावेळी बेळगाव, बिदर, भालकीसह संपूर्ण सीमाभाग महाराष्ट्रात समाविष्ट झालाच पाहिजे, अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला.

यावेळी दिलीप मिस्त्री यांनी महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारला विनंती केली की, गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला बेळगाव सीमाप्रश्न लवकरात लवकर सोडवून सीमाभागातील मराठी भाषिकांना महाराष्ट्रात समाविष्ट करण्याबाबत निर्णय घ्यावा.

श्री. पिराजी पाटील यांनीही महाराष्ट्र सरकारने सीमाप्रश्नाच्या संदर्भात लवकरात लवकर ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी व्यक्त केली.

या आंदोलनावेळी दिग्विजय गुंडू पाटील, जोतिबा इंचनालकर, प्रशांत बिर्जे, मधुकर पाटील, दिलीप मिस्त्री, पिराजी पाटील, गजानन साळुंखे, अशोक सावंत, जयवंत पाटील, शिवाजी कुराडे, चंद्रकांत कालकुंद्रे, अमित पाटील, रानाबा देशवळ, मोहन कळविकट्टे, विठ्ठल कुराडे, शिवसेना शाखा प्रमुख श्री. गोपाळ खाडे, गजानन मनगुतकर, संभाजी मनगुतकर यांच्यासह महाराष्ट्र एकीकरण समितीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

सीमाभागाचा प्रश्न सुटेपर्यंत मराठी भाषिकांच्या मागणीचा आवाज लोकशाही मार्गाने बुलंद ठेवण्याचा निर्धार यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *