Sunday , November 22 2026
Breaking News

करिसिद्धेश्वर मठाचा लाडका हत्ती ध्रुवराज याचे निधन

Spread the love

 

२५ वर्षांपासून भक्तांशी जुळलेले जिव्हाळ्याचे नाते संपुष्टात; अलकनूर परिसरात शोककळा

बेळगाव : रायबाग तालुक्यातील अलकनूर येथील प्रसिद्ध करिसिद्धेश्वर मठाचा लाडका हत्ती ‘ध्रुवराज’ याचे शुक्रवारी (१३ नोव्हेंबर) सकाळी वृद्धापकाळ आणि आजारपणामुळे निधन झाले. त्याच्या निधनाने मठाचे भक्त, ग्रामस्थ आणि हत्तीप्रेमींमध्ये शोककळा पसरली आहे.

सुमारे २५ वर्षांपूर्वी ध्रुवराज हत्तीचे करिसिद्धेश्वर मठात आगमन झाले होते. तेव्हापासून त्याचे मठातील भक्त आणि स्थानिक नागरिकांशी अतूट नाते निर्माण झाले होते. शांत स्वभाव, प्रेमळ वागणूक आणि निरागसतेमुळे ध्रुवराजने सर्वांच्या मनात विशेष स्थान मिळवले होते.

मठातील धार्मिक कार्यक्रमांसह विविध उत्सवांमध्ये ध्रुवराजची उपस्थिती भक्तांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत असे. गेल्या काही दिवसांपासून तो आजारी होता. त्याच्यावर उपचारही सुरू होते. मात्र, उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने शुक्रवारी सकाळी त्याची प्राणज्योत मालवली.

ध्रुवराजच्या निधनाची बातमी समजताच मठाचे भक्त, माहूत, ग्रामस्थ आणि चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली. गेल्या २५ वर्षांपासून सर्वांच्या प्रेमाचा आणि आपुलकीचा विषय असलेल्या ध्रुवराजच्या जाण्याने मठ परिवाराचे मोठे नुकसान झाले आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावात मटका जुगार अड्ड्यांवर पोलिसांचे छापे; चौघांना अटक

Spread the love  ९,८०० रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य जप्त बेळगाव : शहरातील अवैध मटका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *