Sunday , November 22 2026
Breaking News

भारतीय संस्कृतीचे महत्त्व जगाला पटवून देण्याची गरज : डॉ. दिलीप पटवर्धन

Spread the love

 

बेळगाव: “आपल्या भारतीय संस्कृती सारखी उच्च संस्कृती जगात कोठेही नाही आपण भारतीय संस्कृतीचे महत्त्व जगाला समजावून सांगण्याची गरज आहे हे काम जीवन विद्या मिशनचे संस्थापक सद्गुरु वामनराव पै यांनी केले. ते कार्य जीवन विद्येच्या साधकांना पुढे न्यावयाचे आहे”
असे विचार डॉक्टर दिलीप पटवर्धन यांनी बोलताना व्यक्त केले.
सद्गुरु वामनराव पै यांचे शिष्य आणि जीवनविद्या मिशन चे माजी अध्यक्ष तसेच नंदादीप हॉस्पिटल समूहाचे डॉ. दिलीप पटवर्धन यांच्या उपस्थितीत सद्गुरूंच्या तिथीप्रमाणे येणाऱ्या 104 व्या पुण्यतिथी चा कार्यक्रम संपन्न झाला.
जीवनविद्या मिशनच्या बेळगाव शाखेचे प्रबोधनकार शंकरराव बांदकर यांच्या शाहूनगर येथील निवासस्थानी बलिप्रतिपदे दिवशी म्हणजे मंगळवारी सायंकाळी हा कार्यक्रम झाला.
सुमारे 350 साधक उपस्थित राहिलेल्या या कार्यक्रमाची सुरुवात संगीत जीवन विध्येच्या हरिपाठाणे झाली उपस्थित्यांचे स्वागत रवी बांदकर यांनी केले तर डॉ. दिलीप पटवर्धन यांचा सन्मान शंकरराव बांदकर यांनी केला. आपल्या वाणीतून डॉक्टर पटवर्धन यांनी सद्गुरूंचा जीवनपट उलघडून दाखविला.
सद्गुरु नी समाजासाठी जे काही सांगितले त्याबद्दल बोलताना पटवर्धन म्हणाले की सद्गुरूंनी “तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, शरीर साक्षात परमेश्वर हे व यासारखे अनेक क्रांतिकारक सिद्धांत मांडले आहेत त्यामुळेच अनेक जण जीवन विद्या मिशन मध्ये आले” असे सांगून ते पुढे म्हणाले की सर्व जगात शांतता नांदली पाहिजे आणि भारत देश सर्वार्थाने पुढे गेला पाहिजे हेच जीवन विद्येचे मूळ सूत्र आहे. सद्गुरु नी अनेक परिपूर्ण व्याख्या मोजक्या शब्दात केल्या माणसाला पुरेशी संपत्ती म्हणजे किती हवी याबाबत सद्गुरु म्हणतात की “हाती घेतलेले समाजहितोपयोगी काम प्रामाणिकपणे व कौशल्याने करून जी संपत्ती मिळते ती संपत्ती म्हणजे पुरेशी संपत्ती होय.”
जीवनविद्याने काम, क्रोध, लोभ ,मोह, मत्सर याबाबत स्पष्टीकरण केले आहे असे सांगून ते म्हणाले की ” क्रोधाचे रूपांतर सहनशक्ती व सहिष्णुतेतून प्रेमात व्हावे नहून ते जर विकारात झाले तर त्याला संताप म्हणतात, लोभाचे रूपांतर प्रेमात व्हावे ते हव्यासात होता कामा नये तसेच झाले तर तो अतिरेक होईल, मोह हा वाईट गोष्टीसाठी असतो त्याचे रूपांतर संयमात, विरक्तीत आणि वैराग्यात झाले पाहिजे तसेच मत्सर म्हणजे हेवा, मत्सराचे रूपांतर द्वेशात झाले की विकार निर्माण होतो आणि म्हणून मत्सराचे रूपांतर आदरभावात झाले पाहिजे यासाठी आपण जीवन विद्येमध्ये आले पाहिजे” असेही ते म्हणाले .
कार्यक्रमास जीवनविद्या मिशनच्या बेळगाव शाखेचे सतीश बेकवाडकर, तानाजी पाटील, दीपक बिरजे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावात मटका जुगार अड्ड्यांवर पोलिसांचे छापे; चौघांना अटक

Spread the love  ९,८०० रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य जप्त बेळगाव : शहरातील अवैध मटका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *