Sunday , November 22 2026
Breaking News

कार्तिक जळगेकर हिची मिनी ऑलिम्पिक फुटबॉल स्पर्धेसाठी जिल्हा संघात निवड

Spread the love

 

बेळगाव : कौंदल ता. खानापूर गावचे सुपुत्र कार्तिक महेश जळगेकर हिची 14 वर्षाखालील मिनी ऑलिम्पिक फुटबॉल स्पर्धेसाठी बेळगाव जिल्हा संघात निवड झाली आहे, सेंट झेवियर्स शाळेचा विद्यार्थी असलेल्या कार्तिक जळगेकर हा मध्य फळीतील उत्कृष्ट फुटबॉल खेळाडू असून त्याची प्रथमच बेंगलोर येथे आयोजित करण्यात आलेल्या मिनी ऑलिम्पिक फुटबॉल स्पर्धेसाठी बेळगाव जिल्हा फुटबॉल संघात निवड झाली आहे. तो संघासमवेत शुक्रवार ता. 13 नोव्हेंबर रोजी सकाळी रवाना झाला आहे.
कार्तिकला फुटबॉल प्रशिक्षक मानस नायक, रविशंकर मालशेट, चेस्टर रोझारिओ ज्युलेट फर्नांडिस, दीपा सत्तेगिरी यांचे मार्गदर्शन तर फादर सिरीयल बिग्रेस, यांचे मार्गदर्शन लाभत आहेत. केंद्रप्रमुख सीआरपी महेश जळगेकर व मराठी विद्या मंदिर मुरकुटेवाडी तालुका चंदगड शाळेच्या शिक्षिका संगीता जळगेकर यांचा चिरंजीव होय त्याच्या निवडीबद्दल कौंदल व खानापूर तालुक्यातून त्याचे खास कौतुक होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावात मटका जुगार अड्ड्यांवर पोलिसांचे छापे; चौघांना अटक

Spread the love  ९,८०० रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य जप्त बेळगाव : शहरातील अवैध मटका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *