Sunday , November 22 2026
Breaking News

आर्थिक व्यवहारातून वाद; मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या तरुणाच्या गळ्यावर वार

Spread the love

 

सदाशिवनगरातील कॅफेमध्ये हल्ला; सलमान बागेवाडी गंभीर जखमी, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू

बेळगाव : आर्थिक व्यवहारातून सुरू झालेल्या वादात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या तरुणावर तीक्ष्ण हत्याराने गळ्यावर वार करण्यात आल्याची घटना मंगळवारी (दि. १०) सदाशिवनगर येथे घडली. सलमान बागेवाडी (रा. बसवाण कॉलनी) असे जखमीचे नाव असून, त्याला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

याबाबत एपीएमसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी सलमानच्या मोठ्या भावाने काही जणांकडून दहा लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र, कर्जाची परतफेड न झाल्याने संबंधित व्यक्ती सलमानच्या भावाला भेटण्यासाठी सदाशिवनगर येथील एका कॅफेमध्ये आल्या होत्या. तेथे बसून चर्चा सुरू असताना दोन्ही बाजूंमध्ये वादावादी झाली. यावेळी कर्जवसुलीसाठी आलेल्यांनी आईवरून शिवीगाळ केली.

वाद वाढत असल्याचे पाहून सलमानने मध्यस्थी करीत तो मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, याचाच राग मनात धरून दोघांनी सलमानच्या गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केले. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सलमानला मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

दरम्यान, हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया बुधवारी सायंकाळपर्यंत सुरू होती.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावात मटका जुगार अड्ड्यांवर पोलिसांचे छापे; चौघांना अटक

Spread the love  ९,८०० रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य जप्त बेळगाव : शहरातील अवैध मटका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *