Sunday , November 22 2026
Breaking News

दीपावली मिलन २०२६–२७ उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न

Spread the love

 

हिंडलगा : जन कल्याण ट्रस्ट संचलित संत मीरा इंग्लिश मीडियम स्कूल, लक्ष्मीनगर, हिंडलगा येथे १४ नोव्हेंबर २०२६ रोजी दीपावली मिलन २०२६–२७ हा कार्यक्रम उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. दयानंद नेतळकर (संस्थापक, श्रीनिवास इंडक्शन हार्डनिंग) तर प्रमुख वक्ते म्हणून डॉ. माधव प्रभू (डायरेक्टर, सी.एस., के.एल.ई. हॉस्पिटल) उपस्थित होते. तसेच जनकल्याण ट्रस्टचे विश्वस्त श्री. लक्ष्मण पवार, शाळेचे तात श्री. प्रसाद पंडित, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. विजय गोवेकर, सचिव श्री. देविप्रसाद कुलकर्णी, खजिनदार श्री. रमेश लद्दढ सदस्य श्री. ग्रामोपाध्ये जी, श्री. रामनाथ नाईक आणि मुख्याध्यापिका सौ. आरती पाटील यांची उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाची सुरुवात पालकांच्या स्वागताने व मनोरंजक खेळांनी झाली. त्यानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी गोमाता पूजन, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, पाडवा आणि भाऊबीज या सणांचे महत्त्व सांगून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविले. इयत्ता दुसरी व नववीच्या विद्यार्थ्यांनी सुंदर नृत्य सादर केले. गणेश चतुर्थीनिमित्त आयोजित स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.

डॉ. माधव प्रभू यांनी प्रात्यक्षिकाद्वारे जलसंवर्धनाचे महत्त्व, PYAAS Foundation चे कार्य आणि पाणी बचतीचा संदेश दिला. प्रमुख पाहुणे श्री. दयानंद नेतळकर यांनीही प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे भव्य गंगा आरती. वानिरमेश आणि त्यांच्या टीमने गंगा आरती सादर केली. पारंपरिक वेशभूषा, सुंदर सजावट आणि प्रज्वलित आरती यांमुळे उपस्थितांना गंगा घाटावरील आरतीचा अनुभव मिळाला. त्यानंतर सर्व मान्यवर, पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांनी सामूहिक दीपप्रज्वलन करून एकता, प्रेम आणि आनंदाचा संदेश दिला. शेवटी सर्वांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले.

डॉ. विजय गोवेकर यांनी आभार प्रदर्शन केले. संस्कृती, परंपरा, भक्ती आणि ज्ञान यांचा सुंदर संगम असलेला हा दीपावली मिलन सोहळा उत्साहात संपन्न झाला.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावात मटका जुगार अड्ड्यांवर पोलिसांचे छापे; चौघांना अटक

Spread the love  ९,८०० रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य जप्त बेळगाव : शहरातील अवैध मटका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *