Sunday , September 20 2026
Breaking News

प्रकाश भोसले यांचे मरणोत्तर नेत्रदान

Spread the love

बेळगाव : सदाशिवनगर येथील रहिवासी प्रकाश शिवाजीराव भोसले यांचे अल्पशा आजाराने दुखःद निधन झाले. निधनसमयी ते ७३ वर्षाचे होते.
निधनानंतर जायंट्स आय फौंडेशनचे संस्थापक मदन बामणे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत भोसले कुटुंबियांनी नेत्रदान करण्यास समर्थता दर्शविली.
लागलीच के एल ई नेत्रपेढीच्या डॉ. अनु प्लासीड आणि डॉ. समवेद्य यांनी आपल्या सहकाऱ्यांसह नेत्रदानाची प्रक्रिया पूर्ण केली.
गेली अनेक वर्षे जायंट्स आय फौंडेशनच्या माध्यमातून नेत्रदान त्वचादान तसेच देहदानाबद्दल जागृती करण्यात येत आहे आणि त्याला चांगला प्रतिसाद सुद्धा मिळत असून अनेक गरजू अंध व्यक्तीना याचा लाभ होत आहे.
प्रकाश भोसले हे अविवाहित होते. त्यांच्या पश्चात भाऊ, बहीण, वहिनी, पुतणे, पुतणी असा परिवार आहे.
मराठा बँकेचे निवृत्त कर्मचारी अजित भोसले यांचे ते बंधू होत.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *