Sunday , July 26 2026
Breaking News

श्रीपंत विवाह सोहळ्यासह, उद्या मंगळवारी श्रीपंत गुरुचरित्र पोथी वाचन शिबिराची सांगता

Spread the love

बेळगाव : श्रीदत्त संस्थान बाळेकुंद्री यांच्या वतीने दिनांक 14 ते 17 मे दरम्यान श्री पंत बोधपीठ वासंतिक शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या मंगळवारी 17 मे रोजी श्रीपंत विवाह सोहळ्यासह श्रीपंत गुरुचरित्र पोथी वाचन शिबिराची सांगता होणार आहे.
सालाबादप्रमाणे या वर्षीही श्रीपंत गुरुचरित्र पोथी सामुदायिक वाचन शिबिर,श्री पंत बाळेकुंद्री दत्त संस्थानात आयोजित करण्यात आले आहे. पोथीवाचनासह,कीर्तन, भजन व अन्य कार्यक्रम गेल्या चार दिवसांपासून सुरू आहेत. श्रीपंत गुरुचरित्र पोथी वाचन शिबिरात आरती, सामुदायिक नामस्मरण, सामुदायिक भजन, माझ गाव माझं बोधपीठ, प्रचारकांचे मनोगत, प्रशस्ती प्रदान सोहळा, बालगोपाळांसाठी विशेष कार्यक्रम, पालखी सेवा, महाप्रसाद असा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
उद्या मंगळवारी सकाळी सात वाजता आरती होणार आहे. त्यानंतर साडेसात वाजता सामुदायिक नामस्मरणाला सुरुवात होईल. सकाळी साडे आठ ते अकरा वाजेपर्यंत पोथु वाचनाचे पाचवे सत्र संपन्न होईल. त्यानंतर सकाळी अकरा ते साडेबारा या वेळेत श्रीपंत सोहळा होणार आहे. दुपारी साडेबारा ते अडीच या दरम्यान महाप्रसाद होणार आहे. दुपारी तीन ते साडेपाच या दरम्यान सहाव्या सत्राने पोथी वाचनाची सांगता होईल. त्याच बरोबर सायंकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत पालखी सोहळा होणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *