Sunday , September 20 2026
Breaking News

भरधाव कॅन्टरची राणी चन्नमा पुतळ्याच्या चौथऱ्याला धडक

Spread the love

 

बेळगाव : एका भरधाव कॅन्टरने रात्री 11 च्या सुमारास चन्नम्मा चौकातील राणी चन्नमा पुतळ्याच्या चौथऱ्याला धडक दिल्याची घटना मंगळवारी रात्री घडली आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

अधिक माहिती अशी की, काल रात्री साधारण 11 च्या सुमारास एक मालवाहू कॅन्टर क्र.KA 23, 3581 सिव्हिल इस्पितळाकडून राणी चन्नम्मा चौकाकडे भरधाव वेगाने येत होता. वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहनाची चौथऱ्याला जोराची धडक बसली. या घटनेत चौथऱ्याचे नुकसान झाले आहे.
वाहनाचा या धडकेत चौथऱ्याशेजारी असलेला संरक्षक कठडा उखडला आहे. या घटनेत कॅन्टरमधील क्लिनर किरकोळ जखमी झाला आहे. या धडकेत वाहनाचे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *