Monday , September 21 2026
Breaking News

मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा 21 रोजी सत्कार

Spread the love

माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप यांची उपस्थिती

बेळगाव : मराठा समाज सुधारणा मंडळातर्फे मराठा समाजातील यंदाच्या दहावी परीक्षेत 90 टक्के व बारावी परीक्षेत 85 टक्के गुण घेतलेल्या 273 गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा रविवार दि. 21ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला आहे.
रेल्वे ओव्हर ब्रिजजवळील मराठा मंदिर येथे सकाळी 10. 30 वा. होणाऱ्या या सोहळ्यास प्रमुख पाहुणे या नात्याने माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप उपस्थित राहणार आहेत. मंडळाकडे नांव नोंद केलेल्या पात्र विद्यार्थ्यांनी पालकांसह वेळेवर उपस्थित रहावे व अधिक माहितीसाठी कार्याध्यक्ष शिवराज पाटील (9845960531) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी केले आहे.

रमाकांत खलप यांचा अल्पपरिचय
गोव्याचे माजी उपमुख्यमंत्री, केंद्रीय राज्यमंत्री, साहित्यिक, शैक्षणिक, राजकीय, सहकार व सांस्कृतिक क्षेत्रात वावर, कायद्याचे शिक्षण बेळगावात त्यामुळे बेळगावशी जवळचा संबंध, एक उत्कृष्ट वक्ते म्हणून परिचित.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *