Sunday , July 26 2026
Breaking News

खिळेगाव पाणी योजनेच्या ऐनापुर जॅकवेलची आमदारांकडून पाहणी

Spread the love

डिसेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याची अधिकार्‍यांना सूचना

अथणी : अथणी व कागवाड मतदार संघातील दुष्काळग्रस्त गावांना पाणी मिळावे हेच आपले स्वप्न आहे. डिसेंबरमध्ये खिळेगाव-बसवेश्वर पाणी पुरवठा योजनेचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करणारच, असा विश्वास माजी मंत्री व आमदार श्रीमंत पाटील यांनी व्यक्त केला.
खिळेगाव बसवेश्वर पाणी पुरवठा योजनेच्या ऐनापूर येथील मुख्य जॅकवेलला भेट देऊन प्रगतीपथावर असलेल्या पाणीपुरवठा योजनेची त्यांनी पाहणी केली. यानंतर अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन त्यांनी कामाची गती आणखी वाढवा आणि डिसेंबर पूर्वी याचे काम कर पूर्ण करा अशी सूचना त्यांनी केली.
आ. पाटील म्हणाले, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई व कर्नाटक पाटबंधारे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांच्या उपस्थितीत बंगळूरला बैठक झाली. मुख्यमंत्र्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही या योजनेसाठी निधी कमी नसून फक्त कामाचा उरक लवकर करा, अशी कडक सूचना कंत्राटदारांना दिली आहे. या योजनेचे उद्घाटन डिसेंबर मध्ये आपण स्वतः येऊन करू, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचा आ. श्रीमंत पाटील यांनी पुनरुच्चार केला.
यावेळी व्यवस्थापकीय संचालक मल्लिकार्जुन गुंगे, बेळगावचे मुख्य पाटबंधारे अभियंता के राजेश, अथणी विभाग पाटबंधारे विभागाचे अभियंता बी. आर. राठोड, जे श्रीनाथ, के रवी, प्रवीण हुनशीकट्टी, प्रशांत पोतादार, बसवराज गलगली यांच्यासह पाटबंधारे विभागाचे अधिकारी, गायत्री कनेक्शन आणि कंत्राटदार. केएमएफ संचालक श्री आप्पासाहेब अवताडे, स्थानिक नेते दादागौडा पाटील, मुरगेप्पा मगदूम, रामा सोड्डी, दिलीप पवार, संजय तेलसंग यांच्यासह स्थानिक नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *