Sunday , September 20 2026
Breaking News

दिवाळीनिमित्त प्रातःकालीन गायन मैफिलीचे 23 ऑक्टोबरला आयोजन

Spread the love

 

बेळगाव : आर्ट्स सर्कल बेळगांव तर्फे सालाबादप्रमाणे रविवार दि. २३ ऑक्टोबर २०२२ रोजी पहाटे ६:०० वाजता दिवाळीनिमित्त प्रातःकालीन गायन मैफिलीचे आयोजन करण्यात आलेले आहे. ही मैफील रामनाथ मंगल कार्यालय, पहिला क्रॉस, भाग्यनगर येथे सादर होईल. सदर मैफिलीमध्ये सर्व रसिकांना प्रवेश मुक्त आहे. यावर्षी पं. आनंद भाटे यांच्या गायनाचा आनंद रसिकांना मिळणार आहे. त्यांच्याबरोबर तबल्यावर श्री. श्रीधर मांड्रे आणि संवादिनीवर श्री. मुकुंद गोरे हे कलाकार आहे.

आनंद भाटे हे महान किराणा परंपरेतील नवीन पिढीतील अग्रगण्य कलाकार आहेत. त्यांनी बालपणापासूनच संगीताध्ययन सुरू केले आणि तेव्हांपासून ते हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम सादर करीत आहेत. महान शास्त्रीय गायक, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे शिष्य होण्याचा बहुमान त्यांना लाभला आहे.
आनंद यांनी संपूर्ण भारतात आणि परदेशात शास्त्रीय गायन सादर केले आहे. सवाई गंधर्व संगीत महोत्सव, पंडित जितेंद्र अभिषेकी संगीत समरोह इत्यादी अनेक प्रतिष्ठित संगीत संमेलनांचा त्यात समावेश आहे. बालगंधर्व चित्रपटात त्यांनी पार्श्वगायन केले आहे आणि त्यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायनाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. शास्त्रीय ख्याल गायकीपासून ते ठुमरी, नाट्यगीत आणि भजने/अभंग यांसारख्या उपशास्त्रीय संगीत सादर करण्यात त्यांचा हातखंडा आहे. संगीत सौभद्र या संगीत नाटकात श्रीकृष्णाची भूमिका साकारून त्यांनी मराठी रंगभूमीवरही मोलाचे योगदान दिले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *