Sunday , September 20 2026
Breaking News

ज्येष्ठ क्रीडा शिक्षक रऊफखांन पठान यांना राष्ट्रीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार हैद्राबाद येथे प्रदान

Spread the love

 

डिचोली : डिचोली येथील राधाकृष्ण विद्यालयाचे ज्येष्ठ क्रीडा शिक्षक श्री. रऊफखांन पठान यांना आंतरराष्ट्रीय शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रीय स्तरावरील “अविष्कार फॉउंडेशन इंडिया” संस्थेतर्फे राष्ट्रीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार हैद्राबाद येथे प्रदान सोहळा संपन्न झाला.

हा पुरस्कार काल रविवार दि. 16 ऑक्टोबर 2022 रोजी हैद्राबाद येथील सालारजंग म्युझीयम सभागृहात एका शानदार कार्यक्रमात गृहमंत्री (कॅबिनेट) तेलंगना सरकार (हैद्राबाद) श्री मोहम्मद मेहमूद व समारोह अतिथी माननीय जस्टीस चांद्रय्याजी (चेअरमन ह्युमन राईट्स कॉमिशन तेलंगना स्टेट (हैद्राबाद) यांच्या शुभ हस्ते बहाल करण्यात आला. या संस्थेतर्फे या पुरस्कारसाठी प्रत्येक राज्यातून एक राष्ट्रीय व राज्यस्तरीय आदर्श शिक्षकाची निवड करण्यात येते. गोव्यातून ह्या पुरस्करासाठी श्री. रऊफखांन पठान यांना हा सन्मान लाभला.
हा पुरस्कार श्री. रऊफखांन पठान गेल्या 33 वर्षापासूनच्या क्रीडा, संस्कृतिक व सामाजिक कार्याच्या सेवेसाठी तसेच यापूर्वी त्यांना मिळालेले तीन राज्यस्तरीय सरकारी पुरस्कारांचा निकषावर देण्यात आला.

क्रीडा शिक्षक श्री. रऊफखांन पठान याना आतापर्यंत अनेक पुरस्कारानी व सन्मान प्रशंसापत्रानी सन्मानित केले गेले आहे. क्रीडा शिक्षकी पेश्या बरोबरच ते एक उत्कृष्ठ एन.सी.सी. अधिकारी, राष्ट्रीय कबड्डी पंच, राष्ट्रीय खो-खो पंच, राष्ट्रीय अथलेटिक्स पंच व GCA चे प्रथम दर्ज्याचे क्रिकेट पंच म्हणून ख्यातनम आहेत. विशेष म्हणजे ते गेल्या 15 बर्षा पासून डिचोली तालुका शारीरिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष आहेत तर राज्यस्तरीय संघटनेचे उपाध्यक्ष आहेत.

श्री. रऊफखांन पठान यांचा पुरस्कराने राधाकृष्ण विद्यालयाच्या यशात मनाचा तुरा खोवला गेला आहे. त्यामुळे राधाकृष्ण विद्यालय व्यवस्थापन मंडल, मुख्याध्यापक व शिक्षकवर्गादीकडून तसेच असंख्य डिचोलीवासियाकडून अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे.

दड्डी गावचे सुपुत्र व श्रीमती सुंदराबाई भांदुर्गे हायस्कुलचा माजी विद्यार्थी होते.

About Belgaum Varta

Check Also

गणेशोत्सवासाठी यमकनमर्डी पोलिसांकडून गणेश मंडळाना मार्गदर्शक सूचना : पीएसआय आर. बी. पाटील

Spread the love  मंडप, मिरवणूक व विसर्जनावेळी नियमांचे पालन करण्याचे आवाहन दड्डी वार्ताहर.. आगामी गणेशोत्सवाच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *