Sunday , September 20 2026
Breaking News

मतिमंदांची पालकांनी विशेष काळजी घ्यावी : आमदार लक्ष्मी हेब्बाळकर

Spread the love

 

बेळगाव : मतिमंदांच्या उत्कर्षासाठी समाजातील प्रत्येकाने कार्य केले पाहिजे. लहान मुले म्हणजे देवघरची फुले असे आपण मानतो. त्याचप्रमाणे मतिमंद मुले देखील देवाची मुले असे समजून त्यांच्याशी प्रेमाने व आपुलकीने वागले पाहिजे. त्यांनाही आपल्या कुटुंबाचा एक भाग मनाला पाहिजे, असे बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
बेळगांव ग्रामीण मतदारसंघातील तीन दिव्यांगाना तीन चाकी वाहनांचे वितरण करण्यात आले त्यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, अपंग विकलांग मुलांची त्यांच्या पालकांनी विशेष काळजी घेतली पाहिजे. अपंगांना त्यांच्या गरजेनुसार आवश्यक साधने उपकरणे देऊन समाजातील इतर माणसांप्रमाणे पुढे येण्यासाठी शक्य ती मदत केली पाहिजे.
यावेळी विधानसभा परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, माजी एपीएमसी अध्यक्ष युवराज कदम, नागेश देसाई, युवक काँग्रेस नेते मृणाल हेब्बाळकर, बागन्ना नरोटी यांच्यासह ग्रामीण मतदार संघातील नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *