बेळगाव : मधमाशांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या 73 वर्षीय इसमाचा आज गुरुवारी दुपारी मृत्यू झाला आहे. भैरू गुंडू मोरे राहणार हलगा (तालुका-बेळगाव) असे मृत इसमाचे नाव आहे.
शेत शिवार असणारे भैरू हे किराणा दुकानही चालवायचे. रविवारी पिक पाहण्यासाठी ते शिवाराकडे गेले होते. यावेळी मधमाशांनी त्यांच्यावर हल्ला चढविला. यामध्ये ते जखमी झाले होते.
जखमी अवस्थेत कसेबसे ते घरी आले. कुटुंबीयांनी तात्काळ त्यांना उपचारासाठी इस्पितळात दाखल केले होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचाराचा उपयोग झाला नाही. आज गुरुवारी दुपारी त्यांचा मृत्यू झाला.
त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.