बेळगाव : बेळगाव येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात सहभागी होणार नसल्याचे ठरवून माजी मंत्री के. एस. ईश्वरप्पा आणि रमेश जारकीहोळी हे अधिवेशनापासून लांब राहिले होते, मात्र बुधवारी रात्री मुख्यमंत्र्यांनी चर्चा केल्याच्या पार्श्वभूमीवर आज के. एस. ईश्वरप्पा आणि रमेश जारकीहोळी हे दोघेही एकत्रित सभागृहात आले.
प्रसारमाध्यमांशी बोलताना ईश्वरप्पा म्हणाले की, आम्ही कलंकातून मुक्त झालो आणि क्लीन चिट मिळाली आहे. त्यामुळे आमचे कार्यकर्ते, आमदार आणि मंत्री आम्हाला मंत्रिमंडळ समावेशाबाबत विचारत आहेत. त्यामुळे आमच्या प्रतिष्ठेवर परिणाम होत आहे. मुख्यमंत्री बोम्मई यांनी वरिष्ठांशी बोलून आम्हाला योग्य मंत्रिपद देण्याचे आश्वासन दिल्याच्या पार्श्वभूमीवर आज आम्ही सभागृहात उपस्थित राहिलो आहोत असे त्यांनी सांगितले.