बेळगाव : बेळगाव येथील मराठा मंडळ कला, वाणिज्य, विज्ञान आणि गृह विज्ञान महाविद्यालय, स्नाकोत्तर एम.काँम. आणि एम.एस्सी.विभागात क्रिडा आणि विविध संघटनांचे उद्घाटन झाले.
या समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून मराठा मंडळ फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विष्णु कंग्राळकर हे उपस्थित होते. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य जी.वाय. बेन्नाळकर हे होते.
कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवनाने झाली. यानंतर नँक समन्वय अधिकारी प्रा. एम. आर. तेली यांनी सर्वांचे स्वागत केले. यावेळी प्रमुख अतिथी डॉ. विष्णु कंग्राळकर यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून कार्यकमाचे उद्घाटन करण्यात आले.
पुष्पाअर्पना नंतर प्रमुख अतिथीच्या रूपाने बोलताना डॉ. विष्णु कंग्राळकर म्हणाले की, विद्यार्थी आपल्या जीवनात मोबाईल खेळांच्या मागे न लागता व्यायाम आणि मैदानी खेळांच्या माध्यमातुन सदृढ मन आणि शरीर ठेऊन सुंदर कार्य करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
अध्यक्षीय भाषणातून बोलताना प्राचार्य जी. वाय. बेन्नाळकर म्हणाले की, विद्यार्थी आपल्यासमोर काय केले पाहिजे याची चौकट बनवून त्यातून उत्तमरितीने ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. तरच ते उन्नत शिखर गाठु शकतात.
या कार्यक्रमाला एन.एस.एस. अधिकारी व क्रिडा निर्देशक प्रा. राजू हट्टी, डॉ. डी. एम. मुल्ला, डॉ. गिरी माने, प्रा. जगदीश यळ्ळुर , प्रा.मनोहर पाटिल, डॉ.आरती जाधव, प्रा. सोनाली पाटील, प्रा.भाग्यश्री चौगले, प्रा.सीमा खनगांवकर, प्रा.मनिषा चौगले, डॉ. वृषाली कदम, प्रा.शिल्पा मोदकप्पगोळ , विद्यार्थी प्रतिनीधी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेवटी प्रा. तुकाराम यानी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अर्चना भोसले यांनी केले.