बेळगाव : शहरातील कंग्राळ गल्ली येथील श्री वेताळ देवस्थानचा वार्षिक पूजा उत्सव उद्या रविवार दि. 25 डिसेंबर 2022 रोजी आयोजित केला असून भाविकांनी याची नोंद घेऊन उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
कंग्राळ गल्लीतील श्री वेताळ देवस्थानचा वार्षिक पूजा उत्सवानिमित्त उद्या रविवारी सकाळी 7 वाजता लघुरुद्राभिषेक व पुण्याहवाचन सौ. मलप्रभा व श्री. प्रल्हाद निंगोजीराव पाटील यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर श्री सत्यनारायण पूजा सायंकाळी 7 वाजता सौ. सुश्मिता व श्री. मंजूनाथ गोपाळ सांबरेकर यांच्या हस्ते आयोजित करण्यात आली आहे. तरी सर्व भक्तांनी पूजा व तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पंचमंडळ सल्लागार समितीचे अनंतराव जाधव, मालोजी अष्टेकर, शंकर बडवाण्णाचे, अशोक कंग्राळकर, गोपाळ सांबरेकर, बाबूराव कुट्रे, प्रकाश पाटील, परशराम दरवंदर, दौलत मोरे आणि रमेश मोरे यांनी केले आहे.