Sunday , July 26 2026
Breaking News

काँग्रेसचे “भाजप हटाव” आंदोलन 11 जानेवारीला

Spread the love

 

 

बेळगाव : येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपला सत्तेवरून पायउतार करण्यासाठी 11 जानेवारीला बेळगावच्या वीरसौध येथील महात्मा गांधींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून काँग्रेसची बस यात्रा काढण्यात येणार आहे. माजी मंत्री बसवराज रायरेड्डी यांनी आज बेळगावात ही माहिती दिली.

बुधवारी शहरातील काँग्रेस भवनात बोलावलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना माजी मंत्री बसवराज रायरेड्डी म्हणाले, काँग्रेस 11 जानेवारीला बेळगावच्या वीरसौध येथील महात्मा गांधींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून काँग्रेस भाजप हटाओ आंदोलन करणार आहे. त्यानंतर सकाळी 11 वाजता चिक्कोडी येथे जाहीर सभा आणि दुपारी बेळगाव येथील अंजुमन हॉलमध्ये जाहीर सभा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बेळगाव जिल्ह्यात संयुक्त बस यात्रा काढल्यानंतर ते चार दिवस विश्रांती घेतील आणि विजयनगर, कोप्पळ, बागलकोट, गदग, हावेरी येथे होणाऱ्या यात्रेची तसेच उत्तर कर्नाटकातील यात्रेची माहिती देणार असल्याचे त्यांनी सांगितले.बस यात्रेनंतर विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या उत्तर कर्नाटकातील 112 विधानसभा मतदारसंघांचा आणि 14 लोकसभा मतदारसंघांचा दौरा करणार आहेत. सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली सर्व नेते दौरे करणार आहेत. 30 जानेवारी किंवा 2 फेब्रुवारीला बसवकल्याण येथून दौरा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सिद्धरामय्या बेळगाव जिल्ह्यातील 15 विधानसभा मतदारसंघांचा दौरा करणार आहेत. उर्वरित तीन विधानसभा मतदारसंघात बस यात्रा काढण्यात येत आहे. भ्रष्ट भाजप सरकारला पायउतार करण्यासाठी काँग्रेसने पण केला आहे असे त्यांनी सांगितले.

यावेळी काँग्रेस बेळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी, बेळगाव महानगर जिल्हाध्यक्ष राजू शेठ, अनंत ब्याकुड, परशुराम वग्गन्नावर, गजू धरनायक आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *