बेळगाव : बेळगावच्या खासबागमधील बाडीवाले कॉलनी येथील भाग्यलक्ष्मी महिला संघाकडून शिवजयंती साजरी करण्यात आली.
यावेळी महिला संघाने शिवरायांचा जन्मोत्सव साजरा करून पाळणा गीत गायले. यावेळी भाग्यलक्ष्मी महिला संघाच्या अध्यक्षा स्मिता अनगोळकर, संगीत बाडीवाले, पुष्पा कणबरकर, गीता पाटील, शीला साखळकर, अर्चना पटाईत, लालू बाडीवाले, विनायक अनगोळकर, महावीर कमाल, विनायक चौगुले, अनिल अणावेकर आणि इतर उपस्थित होते.