बेळगाव : मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळातर्फे परंपरेनुसार तिथीप्रमाणे आज गुरुवार दिनांक 9 मे रोजी अभूतपूर्व उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी अशा जय जयकारात शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला.
आज सकाळी विविध गडकिल्ल्यांवरून आणलेल्या शिवज्योतींचे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक येथे मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळातर्फे स्वागत करण्यात आले. त्यानंतर शहरातील नरगुंदकर भावे चौक येथे शिवमूर्तीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर शहापूर येथील छत्रपती शिवाजी उद्यानातील शिवरायांच्या मूर्तीला अभिषेक घालून विधिवत पूजा करून पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले.
यावेळी उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, जय जय भवानी जय शिवाजी अशा घोषणांनी आसमंत दणाणून सोडला होता. विधिवत पूजनानंतर शिवरायांची आरती म्हणण्यात आली. यावेळी मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर, माजी नगरसेवक रणजीत चव्हाण पाटील, समिती नेते रमाकांत कोंडुस्कर, महादेव पाटील, नगरसेवक रवी साळुंखे, माजी उपमहापौर रेणू किल्लेकर, शिवानी पाटील, मदन बामणे, उमेश पाटील, विकास कलघटगी, रमेश पावले, नेताजी जाधव, शिवराज पाटील, प्रशांत भातकांडे, मनोहर हलगेकर, बाबू कोले, अनिल आमरोळे, युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर, श्रीकांत कदम, संतोष कृष्णाचे, मोतेश बारदेशकर, गणेश दड्डीकर यांच्यासह समिती कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.