Sunday , July 26 2026
Breaking News

17 पासून शाळांचे वर्ग पुनश्च सुरू : जिल्हाधिकार्‍यांचा आदेश

Spread the love

बेळगाव (वार्ता) : वाढत्या कोरोना प्रादुर्भावाचा धोका लक्षात घेऊन बंद ठेवण्यात आलेले जिल्ह्यातील सर्व माध्यमांचे इयत्ता पहिली ते नववी पर्यंतचे शालेय वर्ग येत्या 17 जानेवारीपासून पुनश्च सुरू केले जावेत, असा आदेश जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी जारी केला आहे.
राज्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग आणि कोरोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेचा धोका लक्षात घेऊन सरकार आणि प्रशासनाने कोरोना नियमांची कठोर अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे.
या पार्श्वभूमीवर अलीकडे कित्तूर येथील कित्तूर राणी चन्नम्मा सैनिक निवासी शाळेमधील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित झाल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या शाळांचे इयत्ता पहिली ते नववी पर्यंतचे वर्ग 11 ते 18 जानेवारी 2022 या कालावधीत बंद ठेवण्याचा आदेश बजावण्यात आला होता.
आता कोरोना परिस्थितीचा एकंदर अभ्यास केल्यानंतर तज्ञांच्या सल्ल्यावरून शाळा पूर्ववत सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने बेळगावचे जिल्हाधिकारी व दंडाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी येत्या 17 जानेवारीपासून सर्व माध्यमांचे इयत्ता पहिली ते नववी पर्यंतचे वर्ग पूर्ववत सुरू करण्याचा आदेश बजावला आहे.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *