Monday , September 21 2026
Breaking News

श्रावणी सोमवारनिमित्त दक्षिण काशी सजली; भाविकांची गर्दी

Spread the love

 

बेळगाव : आज पहिल्या श्रावण सोमवार निमित्त बेळगावच्या श्री क्षेत्र दक्षिण काशी, श्री कपिलेश्वर देवस्थानात श्री कपिलनाथाची विशेष आरास करून धार्मिक विधी पार पाडण्यात आल्या.

श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारनिमित्त बेळगावच्या श्री क्षेत्र दक्षिण कशी श्री कपिलेश्वर मंदिरात विशेष पूजेचे आयोजन करण्यात आले होते. श्रावण महिन्यात महादेवाची आराधना केली जाते. या पार्श्वभूमीवर आज कपिलनाथांचे दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच भाविकांनी मोठी गर्दी केली होती. मंदिर परिसराला आकर्षक सजावट करण्यात आली होती. ज्योतिर्लिंगांची यात्रा कपिलनाथांच्या दर्शनाशिवाय पूर्ण होत नाही अशी मान्यता या देवस्थानाला असून आज श्रावणी सोमवार निमित्त मंदिरात भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. श्रावण महिन्यातील दर सोमवारी महादेवाची आराधना करून उपवास आणि व्रत करण्याची प्रथा हिंदू संस्कृतीत असल्याने आज कपिलेश्वर मंदिरात शिवमंत्राचा जप करत अनेक भाविकांनी उपस्थिती दर्शविली.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *