बेळगाव : रोटरी इ क्लब बेळगावने आज दि.13 सप्टेंबर रोजी महिला विद्यालय मराठी शाळेच्या सभागृहात नेशन बिल्डर्स पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. प्रांतपालांचे सहाय्यक व माजी अध्यक्ष रो. अनंत नाडगौडा यांच्या हस्ते सरकारी शाळेतील शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
श्रीमती सुनीता जाधव, श्रीमती सुधाताई पाटील, श्री. सुभाष भातकांडे, श्री. श्रीशैल कामत हे पुरस्कारांचे मानकरी होते.
अध्यक्षा रो. लक्ष्मी मुतालिक यांनी स्वागत केले. माजी अध्यक्ष रो. डॉ. प्रकाश फडणीस यांनी क्लबच्या प्रकल्पाबद्दल माहिती दिली.
प्रमुख पाहुणे रो. अनंत नाडगौडा यांनी शिक्षकांनी इतर गुणांबरोबर मानवता हा ही गुण शिकविला पाहिजे असे मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा रो. कविता कणगणी यांनी नेशन बिल्डर्स पुरस्काराचे महत्त्व सांगितले. पुरस्कार मिळालेल्या शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले.
रो. लता कित्तूर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा रो. कविता कणगणी यांनी आभार मानले. सचिवीय टिप्पणी रो. सागर वाघमारे यांनी केली. यावेळी क्लबचे सदस्य उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.