Friday , November 6 2026
Breaking News

आधार सौहार्द सोसायटीतर्फे अष्टेकर व लाड यांचा सत्कार

Spread the love

 

बेळगाव : महाद्वार रोड स्थित श्री आधार मल्टीपर्पज सौहार्द सोसायटीच्या वतीने पायोनियर बँकेचे चेअरमन श्री. प्रदीप अष्टेकर व संचालक अनंत लाड यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. या सोसायटीचे अष्टेकर व लाड हे दोघेजण संस्थापक असून पायोनियर बँकेच्या निवडणुकीत प्रचंड मताधिक्याने ते दोघेही विजयी झाले. तसेच प्रदीप अष्टेकर यांची पुन्हा चेअरमनपदी निवड झाली त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करणारी सर्वश्री सुभाष देसाई, सुनील चौगुले, के. बी. संकनावर यांची भाषणे झाली.
चेअरमन श्री. सुभाष देसाई आणि माजी चेअरमन श्री. अनंत पाटील यांच्या हस्ते अष्टेकर व लाड यांचा सन्मान करण्यात आला. सत्काराबद्दल दोघांनीही कृतज्ञता व्यक्त केली आणि बँकेला ऊर्जितावस्था प्राप्त करण्यासाठी जोमाने कार्य करू असे सांगितले. याप्रसंगी संचालक विकास मजूकर, महादेव ठोकनेकर, बाळकृष्ण दंडगलकर, आनंद बाचुळकर, कल्पना मोहिते यांच्यासह व्यवस्थापक के बी संकनावर, अकाउंटंट सौ. सुषमा संजीव देशपांडे, गजानन पवार व प्रवीण अष्टेकर आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *