बेळगाव : श्रीराम कॉलनी आदर्शनगर वडगांव व मेडलाइफ मल्टी स्पेशालिटी क्लिनिक आदर्शनगर, वडगांव बेळगांव यांच्यातर्फे मोफत आरोग्य शिबिर संपन्न झाले. दिनांक. २९/१२/२०२४ रोजी डॉ. श्री. युवराजकुमार यड्रावी एम.डी. व डॉ. सम्रा साहू एम. एस. (गोल्ड मेड्यालीस्ट) यांच्या मार्गदर्शनाखाली श्री गंगा नारायण हाॅलमध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीला डॉक्टरांची ओळख सेक्रेटरी उमेश वाळवेकर यांनी करून दिली. संघटनेतर्फे पुष्पगुच्छ देऊन डॉक्टरचा सत्कार करण्यात आला.
युवराजकुमार यांनी आपल्या भाषणात सांगितले की, आजच्या धावपळीच्या जीवनात आपण आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी व मानसिक ताण तणावा पासून दूर होऊन नियमितपणे, व्यायाम, संतुलित आहार व निद्रा घेण्याची गरज आहे. तसेच वेळोवेळी डॉक्टर तपासणी व मार्गदर्शन घ्यावे. डॉ. सौ. सम्रा यांनी स्त्रीयांनी नौकरी व घरकामातून वेळ काढून आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे व वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार केले पाहिजे असे मत व्यक्त केले.
आजच्या या शिबिरात डाॅक्टर श्री. युवराजकुमार आणि त्याचे सहकाऱ्यांचे विशेष परिश्रमामुळे शंभराहून अधिक रहिवाशांनी लाभ घेतला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघटनेचे सेक्रेटरी उमेश वाळवेकर यांनी केले व संघटनेचे अध्यक्ष श्री. विलास घाडी यांनी आपल्या भाषणात सांगितले की, संघटनेच्या वतीने डॉ. श्री. मुरगेन्द पटृणशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली योग वर्ग सुरू असून परिसरातील अनेक रहिवाशांना यांचा लाभ होतो. याचबरोबर संघटनेमार्फत वेळोवेळी, विविध सामाजिक उपक्रम हाती घेतले आहेत.
श्री. जयवंत खन्नूकर यांनी आभारप्रदर्शन केले. या कार्यक्रमासाठी संघटनेचे खजिनदार श्री. बाबूराव घोरपडे, प्रकाश घाडी, परशुराम सुळेभावी, सोमशेखर सुधिर सांबरेकर, राजाराम गुरव, प्रदीप चव्हाण, जयवंत खन्नूकर, देवकुमार बिर्जे, वासुदेव इनामदार आणि उमाकांत कामुले यांचे विशेष सहकार्य लाभले घेतली.