Monday , June 17 2024
Breaking News

अर्थसंकल्पात विणकरांसाठी विशेष अनुदान मंजुर करावे

Spread the love

बेळगाव : राज्यातील विणकरांच्या वाढत्या आत्महत्येच्या पार्श्‍वभूमीवर आमदार अभय पाटील यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव येथील विणकरांच्या शिष्टमंडळाने बुधवारी बेंगळुर येथे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची भेट घेऊन विणकरांच्या विविध मागण्या पूर्ण कराव्यात आणि आगामी काळात अर्थसंकल्पात विशेष पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी केली.
कोरोना महामारीनंतर, विणकरांना जगण्याच्या गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. विणकर कामगारांना नोकरीची सुरक्षितता नाही. यामुळे प्रतिकूल परिस्थितीत विणकर आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. गेल्या एक वर्षात तब्बल 32 विणकरांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे.
विशेषत: बेळगावमध्ये, बहुतेक विणकर लहान प्रमाणात हातमाग किंवा यंत्रमाग चालवतात. परंतु प्रदूषण नियंत्रण मंडळाची (PCB) मार्गदर्शक तत्त्वे त्यांना त्रास देत आहेत. कारण PCB ला केवळ औद्योगिक क्षेत्रात उद्योग चालवायचा आहे आणि कोणत्याही प्रकारची सरकारी मदत किंवा अनुदान मिळविण्यासाठी संबंधित विभागांकडून एनओसी मिळवायचे आहे. परंतु, बहुतेक विणकर निवासी भागात राहून आपला यंत्रमाग उद्योग चालवतात आणि ते देखील अधिकृत नाहीत. कारण त्यांनी 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर नोंदणी केली आहे. यामुळे लहान प्रमाणात हातमाग आणि यंत्रमाग उद्योग करणाऱ्यांना मोठी अडचण येत आहे. याचा गांभीर्याने विचार करून पीसीबीने तयार केलेले नियम शिथिल करावेत, अशी मागणीही शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

About Belgaum Varta

Check Also

मर्कंटाईल सोसायटीला जॉईंट रजिस्ट्रार यांची भेट

Spread the love  बेळगाव : यंदा रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण केलेल्या दि. मर्कंटाईल को-ऑपरेटिव्ह क्रेडिट …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *