चंद्रपूर : आज दिनांक 23 फेब्रुवारी 2022 बुधवारला चंद्रपूर शहरांमध्ये हिंदुराष्ट्र सेनातर्फे आंदोलन घेण्यात आले हिंदु राष्ट्र सेनेचे संस्थापक (अध्यक्ष) हिंदू तेजसूर्य धनंजय (भाई) जयराम देसाई यांच्या आदेशाने हिंदूराष्ट्र सेनेचे नंदू गट्टूवार, आकाश मारेकर यांच्या अध्यक्षतेत कर्नाटकातील हिंदू युवक हर्षा यांच्या हत्येचा निषेधार्थ आंदोलन करण्यात आले, हत्या करणाऱ्या नराधमांवर कठोर कारवाई करण्यात यावी व त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी याकरिता चंद्रपूर जिल्हाधिकारी यांना निवेदन सुद्धा देण्यात आले. या आंदोलनात हिंदूराष्ट्र सेनेचे पदाधिकारी नंदू गट्टूवार, आकाश मारेकर, सुरज ठाकूर, अंकुश कवठे, मुन्ना जाधव, आकाश कोडमलवार, हिम्मत ठाकूर, नरेश पटेल, अमन पारधी आदी पदाधिकार्यांची उपस्थिती होती..
Check Also
अभिनेता सैफ अली खान याच्यावर चाकू हल्ला
Spread the love मुंबई : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला झाला आहे. वांद्रे …