Sunday , July 26 2026
Breaking News

होळी आणि रंगपंचमी सणाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवस मद्य विक्रीवर बंदी

Spread the love

 

बेळगाव : होळी आणि रंगपंचमी सणाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहर परिसरात 14 आणि 15 मार्च असे दोन दिवस मद्य विक्रीवर बंदी घालण्याचे आदेश जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी बजावले आहेत.

या आदेशानुसार, विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीत होळी साजरी करताना कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मद्यविक्रीवर निर्बंध लादण्यात आले आहेत. शांतता व सुव्यवस्थेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असून, याची अंमलबजावणी कडक पद्धतीने केली जाणार आहे. बार, रेस्टोरंट आणि वाईन शॉप बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले असून, उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. 14 मार्च रोजी सायंकाळी 6 ते 15 मार्च रोजी रात्री 11 वाजेपर्यंत सर्व मद्यविक्री दुकाने रेस्टॉरंट, बार क्लब आणि हॉटेल मधून दारू विक्री करण्यास मनाई करण्यात आलेली आहे.

About Belgaum Varta

Check Also

कंग्राळी बी.के. येथील शालेय विद्यार्थी बेपत्ता

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कंग्राळी बी.के. येथील स्वयंम अमर बसरीकट्टी हा विद्यार्थी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *