बेळगाव : बेळगाव शहराच्या बाहेरील भागात असलेल्या एका रिसॉर्टमध्ये दोन अल्पवयीन मुलांनी १५ वर्षांच्या मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.
सदर घटना दहा दिवसांपूर्वी घडली होती. अल्पवयीन मुलगी जेव्हा घरी परतली तेव्हा तिने पोटदुखीची तक्रार आपल्या आईकडे केली. आईने तिला रुग्णालयात घेऊन गेली तेव्हा हे प्रकरण उघडकीस आले.
या प्रकरणात एका पोलिस अधिकाऱ्याचा मुलगा सहभागी आहे. पोलिसांनी त्याच्याशिवाय दोन मुलांना अटक केली आहे.
साकिब नावाच्या एका व्यक्तीने त्याच्या नावावर एक खोली बुक केली होती. मुलीच्या मैत्रिणीनी मुलीला सोबत घेऊन गेले होते. टिळकवाडी पोलिस ठाण्यात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि आरोपी साकिब आणि आणखी एका अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली आहे. पोलीस दुसऱ्या अल्पवयीन मुलाचा शोध घेत आहेत.