बेळगाव : किणये ग्रामपंचायतीत असलेल्या मराठी शाळेतून १०वी च्या २०२५ बोर्ड परीक्षेत सर्वात जास्त गुण घेऊन उत्तीर्ण होणाऱ्या एक विद्यार्थ्याला समता सौहार्द को-ऑप. सोसायटी रणकुंडयेतर्फे परशराम कोलकार शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.
हि शिष्यवृत्ती रणकुंडये गावचे सिविल इंजिनीअर कै. परशराम कोलकार यांच्या स्मरणार्थ देण्यात येणार आहे अशी माहिती सोसायटीचे अध्यक्ष श्री. विठ्ठल पाटील यांनी दिली.
शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्याला रु ५०००/- आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात येईल. ही शिष्यवृत्ती या वर्षांपासून दरवर्षी दिली जाईल. अधिक माहितीसाठी सोसायटीचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांच्याशी ९६६३७३०५७६ या क्रमांकावर संपर्क साधावा असे कळवण्यात आले आहे.