अहमदाबाद : विमान अपघाताची एक मोठी आणि धक्कादायक माहिती समोर येत आहे. अपघातग्रस्त विमान ज्या इमारतीवर आदळले ते विद्यार्थ्यांचे वसतीगृह असल्याचे समजते. त्यामुळे या अपघातात तब्बल 20 विद्यार्थ्यांचाही मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार एअर इंडियाचे B-787 हे विमान अहमदाबादहून लंडनला जात होते. मात्र टेक ऑफनंतर अवघ्या दहा मिनिटांत या विमानाचा भीषण अपघात झाला आहे. हे विमान एका इमारतीवर आदळले आहे. मेघानी नगरात हे विमान कोसळलं आहे. याच भागात बीजे वैद्यकीय महाविद्यालय आहे. या महाविद्यालयातील वसतीगृहाच्या इमारतीवर हे विमान कोसळले आहे. या वसतीगृहाच्या वर भोजनालय आहे. याच ठिकाणी विद्यार्थी दुपारचे जेवण करायला जतात. विमान थेट वसतीगृहाच्या इमारतीवर कोसळल्यामुळे या अपघातात प्रवाशांसोबतच तब्बल 20 विद्यार्थ्यांचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
विमानाचा मागचा भाग वसतीगृहावर लटकला
हे विमान कोसळल्यानंतर थेट बीजे मेडिकल कॉलेजच्या वसतीगृहाच्या इमारतीवर आदळलं आहे. या अपघाताचे काही फोटो समोर आले आहेत. समोर आलेल्या या फोटोंमध्ये विमानाचा मागील भाग वसतीगृहाच्या इमातीवर लटकत असल्याचे दिसत आहे. तसेच विमानाच्या समोरचा भाग पूर्णपणे जळून गेला आहे.