Sunday , July 26 2026
Breaking News

सीमाप्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी खानापुर युवा समितीचा उपक्रम कौतुकास्पद : दीपक दळवी

Spread the love

बेळगाव : सीमाप्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी खानापुर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे राबविण्यात येणारा उपक्रम अतिशय चांगला आहे यामध्ये अनेकांनी सहभाग घेऊन पंतप्रधान कार्यालयाशी पत्र व्यवहार करावा असे मत मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी व्यक्त केले आहे.
खानापूर तालुका युवा समितीतर्फे ऑगस्ट क्रांती दिन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अकरा हजार पत्रे पाठवली जाणार आहेत. त्याबाबत माहिती देण्यासाठी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच अध्यक्ष दीपक दळवी यांची भेट घेत कशा प्रकारे मोहीम राबविली जाणार आहे. याची माहिती दिली तसेच त्यांना निवेदन सादर केले. त्यानंतर दळवी यांनी बोलताना गेल्या काही दिवसांपासून युवा कार्यकर्ते सीमाप्रश्न व मराठीवर होणाऱ्या अन्याया विरोधात आवाज उठवित असून एकाच वेळी अधिक प्रमाणात पत्रे पाठवण्यात आली तर त्याची दखल घ्यावी लागेल. त्यामुळे फक्त खानापूरातूनच नव्हे तर सीमाभागातील मराठी भाषिकांनी ही या मोहिमेला पाठिबा द्यावा. काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृह राज्यमंत्री राय यांनी महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न कायम असून या ठिकाणी सातत्याने हिंसाचार व शांततेचे वातावरण असते हे मान्य केले आहे. तसेच केंद्राने आसाम सीमेवर होत असलेल्या हिंसाचारासारखी परिस्थिती निर्माण होऊ नये याची दखल घ्यावी असे मत व्यक्त केले.
यावेळी अध्यक्ष धनंजय पाटील, ज्ञानेश्वर सनदी, किशोर हेब्बाळकर, दामोदर नाकाडी, भूपाल पाटील आदी उपस्थित होते. पत्र पाठविण्याबाबत करण्यात येत असलेल्या जनजागृतीला चांगला प्रतिसाद मिळत असून 9 ऑगस्ट रोजी 11 हजार पेक्षा अधिक पत्रे पाठविली जातील असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *