Monday , September 21 2026
Breaking News

येळ्ळूर क्लस्टर क्रीडा स्पर्धामध्ये श्री चांगळेश्वरी हायस्कूल शाळेचे घवघवीत यश

Spread the love

 

येळ्ळूर : येळ्ळूर क्लस्टर क्रीडा स्पर्धामध्ये श्री चांगळेश्वरी हायस्कूल शाळेचे घवघवीत यश. श्री भावकेश्वरी विद्यालय सुळगे येळ्ळूर येथे दि. 08/8/2025 रोजी येथे संपन्न झाल्या. येळ्ळूर क्रीडा स्पर्धामध्ये श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ संचालित श्री चांगळेश्वरी हायस्कूल शाळेच्या मुला -मुलींनी घवघवीत यश संपादन केले. यामध्ये मुलांच्या संघाने ४x४०० मी रीले प्रथम क्रमांक पटकविला तर या सांघिक स्पर्धेत रिले मध्ये मुलींनी द्वितीय, खो -खो मध्ये मुलींनी द्वितीय क्रमांक पटकवला आणि थ्रोबॉल द्वितीय क्रमांक, कब्बडीत व्दितीय क्रमांक पटकवला.

14 वर्षाखालील स्पर्धेमध्ये श्रेयश चांगळी 80 मी. अडथळा प्रथम 200 मी. धावणे प्रथम. प्रसाद कदम गोळाफेक- थाळीफेक व्दितीय. समिक्षा मुतगेकर 100 मी. धावणे व्दितीय थाळीफेक व्दितीय. चेतन भडवाणी उंचउडी तृतीय 17 वर्षाखालील वेदांत कुगजी 800 मी. व्दितीय तिहेरी उडिमध्ये प्रथम. मानव धामणेकर 100 मी. तृतीय 1500 मी व्दितीय थालिफेक तृतीय समर्थ पाटील तिहेरी उडि व्दितीय विनायक बिर्जे उंच उडी प्रथम 5 किमी चालणे प्रथम. माणिक तुकाणाचे साखळी गोळा व्दितीय मुली. सिद्धी कुगजी 100 मी व्दितीय 3000 मी प्रथम. वैदेही पाटील. तिहेरी उडि प्रथम. लांब उडी व्दितीय 200 मी तृतीय. स्वाती लोहार 110 मी उडथळा प्रथम. 800 मी व्दितीय उंचउडी तृतीय. धनश्री कुगजी 3000 मी तृतीय लक्ष्मी नायकोजी लांब उडी प्रथम. तिहेरी उडी व्दितीय. साखळी गोळा व्दितीय. चांगुणा मेलेगे 1500 व्दितीय.

सर्व विद्यार्थांना मुख्याध्यापक ए. डी. धामणेकर, क्रीडा शिक्षक एम. एम. डोंबले, टी. एस. बोकडेकर, ए. बि .कांबळे, एल. एस. बांडगे, वाय. बी. कंग्राळकर, व्ही. पी. जीवाई तसेंच संस्थेचे, अध्यक्ष श्री. वाय. एन. मजुकर, सचिव प्रसाद मजुकर यांचही मार्गदर्शन लाभले. तसेच सर्व विध्यार्थी पालक व गावाकऱ्यांच्या अभिनंदनास पात्र ठरले व पुढील तालूका लेवल स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *