Sunday , July 26 2026
Breaking News

येळ्ळूर केंद्र पातळीवरील क्रीडा स्पर्धामध्ये श्री चांगळेश्वरी हायर प्रायमरी शाळेचे घवघवीत यश

Spread the love

 

 

बेळगाव : गव्हर्नमेंट वाडी शाळा येथे दि. 11/8/2025 व 12/8/2025 रोजी येथे संपन्न झाल्या. येळ्ळूर केंद्र पातळीवर क्रीडा स्पर्धामध्ये श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ संचालित श्री चांगळेश्वरी हायर प्रायमरी शाळेच्या 14 वर्षाखालील मुला -मुलींनी घवघवीत यश संपादन केले. यामध्ये सांघिक स्पर्धेत खो-खो मध्ये मुलांनी व मुलींनी प्रथम क्रमांक पटकविला तर थ्रोबॉल मध्ये मुलांनी व मुलींनी त्या मध्ये पण प्रथम क्रमांक पटकविला. 4×100रिले मुलींनी दुर्वा पाटील, भक्ती बिर्जे, तेजश्री धुळजी व मलाप्रभा धामणेकर यांनी प्रथम क्रमांक व मुलांनी श्रीनाथ हलगेकर, श्रीओम धुळजी, सुशांत हलगेकर आणि प्रवीण कणबरकर यांनी द्वितीय क्रमांक पटकविला. 600 मी. धावण्याच्या स्पर्धेत श्रीओम धुळजी प्रथम व दुर्वा पाटील 600 मी. व 200 मी. आणि लांब उडी मध्ये द्वितीय. तर सोहम कुगजी उंच उडी मध्ये प्रथम. 80 मी. अडथला शर्यत मध्ये श्रीनाथ हलगेकर द्वितीय क्रमांक तसेच योगा मध्ये पण प्रथम क्रमांक पटकविला.

सर्व विद्यार्थांना मुख्याध्यापक आय. बी. राऊत, क्रीडा शिक्षक श्री. एम. एम. डोंबले (क्रीडा शिक्षक) स्नेहल मजुकर, नंदा मुचंडी, सारिका पाटील, संजीवनी धामणेकर, अंकिता पाटील, दिपा हट्टीकर. तसेंच संस्थेचे, अध्यक्ष श्री. वाय. एन. मजुकर, सचिव प्रसाद मजुकर यांचेही मार्गदर्शन लाभले. तसेच सर्व विद्यार्थी पालक व गावकऱ्यांच्या अभिनंदनास पात्र ठरले।व पुढील तालुका पातळीवर स्पर्धासाठी प्रोत्साहन देण्यात आले.

About Belgaum Varta

Check Also

पत्रकार आणि पोलिसांचा बनाव करून खंडणी उकळणाऱ्या चौघांना अटक; हुक्केरी पोलिसांची धडक कारवाई

Spread the love  बेळगाव : पत्रकार आणि पोलीस असल्याचा बनाव करून नागरिकांना धमकावत खंडणी उकळणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *