Monday , September 21 2026
Breaking News

बेळगाव महानगरपालिका चार स्थायी समित्यांच्या अध्यक्षांची निवड बिनविरोध

Spread the love

 

बेळगाव : महानगरपालिकेच्या चार स्थायी समित्यांच्या अध्यक्षांची निवड बिनविरोध पार पडली.
ही प्रक्रिया अशा प्रकारे पार पाडण्यात आली की कोणालाही असमाधान वाटले नाही आणि समान न्याय सुनिश्चित करण्यात आला. आ. अभय पाटील आणि माजी आमदार अनिल बेनके यांच्या नेतृत्वाखाली ही प्रक्रिया पार पडली.

रेखा मोहन हुगार यांची कर आकारणी, वित्त आणि अपील या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी एकमताने निवड झाली. लक्ष्मी महादेव राठोड यांची सार्वजनिक आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक न्याय या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. नगररचना व विकास स्थायी समितीच्या सभापतीपदी माधवी राघोचे यांची निवड करण्यात आली. लेखा स्थायी समितीच्या अध्यक्षपदी नंदू मिरजकर यांची निवड झाली.

नवनिर्वाचित अध्यक्षांचे महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी आणि सत्तारूढ पक्षनेते हनुमंत कोंगाळी यांनी अभिनंदन केले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *