Monday , September 21 2026
Breaking News

कार- दुचाकी अपघातात बेळवट्टी येथील तरुणीचा मृत्यू

Spread the love

 

बेळगाव : बिजगर्णी-बेळवट्टी रस्त्यावरील कावळेवाडी क्रॉसजवळ एका भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात बेळवट्टी येथील तरुणीचा मृत्यू झाला असून मुलीची आई आणि मामा जखमी झाले आहेत. सदर घटना रविवारी सायंकाळी घडली.

अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचे नाव १८ वर्षीय रोहिणी रामलिंग चौगुले असे आहे, ती बेळवट्टी येथील रहिवासी असून तिची आई लक्ष्मी रामलिंग चौगुले (४५) आणि तिचे मामा सतीश विष्णू मोहिते (४०) हे जखमी झाले आहेत आणि त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघातानंतर गंभीर जखमी झालेल्या रोहिणीला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. जखमी लक्ष्मीची प्रकृती गंभीर आहे. तुडयेहून बेळवट्टीला जात असताना ही घटना घडली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

वडगाव येथील जुनैद राजगोळी यांच्याविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक नागनगौडा कट्टीमणीगौडर आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी पुढील तपास हाती घेतला आहे.

मृत रोहिणीच्या पश्चात तिची आजी, आई आणि बहीण आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *