Friday , November 6 2026
Breaking News

अनिल गुरुनाथ अंबरोळे यांची आयबीबीएफच्या सदस्यपदी नियुक्ती

Spread the love

 

बेळगाव : मागील 34 वर्षांपासून शरीरसौष्ठव पट्टू, शरीरसौष्ठव राष्ट्रीय पंच व सामान्य कार्यकर्ता म्हणून कार्यरत असलेले अनिल गुरुनाथ अंबरोळे यांना नुकतेच आयबीबीएफचे सचिव सुरेश कदम यांनी आयबीबीएफचे सदस्यपद प्रमाणपत्र सुपूर्द केले. अनिल अंबरोळे यांना हे सदस्यपद मिळाले ही एक बेळगांवच्या शरीरसौष्ठव क्षेत्राला मिळालेली नवसंजीवनी आहे. 1989 ते 90 या सालापासून मनपा व्यायाम शाळेत सराव करीत 1996 साली दरम्यान जिल्हा व राज्य पातळीवर स्पर्धेत सहभाग तर राष्ट्रीय पंच म्हणून 2014 साली निवड झाली तर 1996 पासून स्थापना झालेल्या बेळगांव जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेत कार्यरत असलेल्या अनिल अंबरोळे यांनी नुतन बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटना व स्पोर्ट्स नावाची नूतन संघटना स्थापन केली व ते त्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष झाले. तसेच मनपा व्यायाम शाळेचेही मागील दीड वर्षापासून अध्यक्षपदाची धुरा सांभाळत असून राज्याध्यक्ष डॉ. संजय सुंठकर, जिल्हाध्यक्ष महेश सातपुते, गौरवाध्यक्ष मिहीर पोतदार, राष्ट्रीय पंच राजेश लोहार, नारायण चौगुले व इतर पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने बेळगांवच्या सर्व शरीरसौष्ठव खेळाडूंना एक राष्ट्रीय व्यासपीठ निर्माण करून देण्यासाठी त्यांनी नूतन संघटनेचा घेतलेला पुढाकार ही बेळगावकरांच्या सर्वसामान्य शरीरसौष्ठव पटुंना फायद्याचे ठरणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *