Monday , June 1 2026
Breaking News

मराठा समाज सुधारणा मंडळातर्फे 1 फेब्रुवारी रोजी वधू-वर मेळाव्याचे आयोजन

Spread the love

 

बेळगाव : मराठा समाज सुधारणा मंडळातर्फे रविवार दि. 1 फेब्रुवारी रोजी वधू-वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
रेल्वे ओव्हरब्रिज जवळील तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन (ओरिएंटल हायस्कूल) येथे सकाळी साडे दहा वाजता या मेळाव्याला प्रारंभ होणार आहे. यासाठी मेलगे गल्ली शहापूर येथील मंडळाच्या कार्यालयात सकाळी 11 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत नवीन नांव नोंदणी सुरू आहे.
योग्य वयात मुला-मुलींचे विवाह व्हावे यासाठी मंडळ प्रयत्नशील आहे. तरी योग्य साथीदार मिळावा यासाठी भावी वधु- वरानी व पालकांनी या मेळाव्यात भाग घेऊन मंडळाच्या वर्षभर चालू असणाऱ्या वधूवर मंडळाच्या कार्यालयाचाही लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

बालवीर विद्यानिकेतनमध्ये विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत

Spread the love  बेळगाव : बेळगुंदी येथील बालवीर सोशल फाउंडेशन संचलित बालवीर विद्यानिकेतन शाळेत नवीन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *