Friday , April 17 2026
Breaking News

मराठी विद्यानिकेतनतर्फे डॉ. शिवाजी कागणीकर यांचा अमृतमहोत्सवी सत्कार

Spread the love

 

बेळगाव : दि. 30 डिसेंबर रोजी दक्षिण महाराष्ट्र संचलित मराठी विद्यानिकेतनतर्फे ज्येष्ठ पर्यावरणवादी सर्वोदयी कार्यकर्ते डॉ.शिवाजी दादा कागणीकर यांचा अमृतमहोत्सवी सन्मान सोहळा व सीए परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या शाळेतील माजी विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा व पहिली ते दहावी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावर शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष सुभाष ओऊळकर, द.म.शि मंडळाचे उपाध्यक्ष ॲड. राजाभाऊ पाटील, सचिव प्रा.विक्रम पाटील, खजिनदार नारायण खांडेकर, डॉ. शिवाजीदादा कागणीकर, प्रा. सुरेश पाटील, किरण पाटील, आनंद पाटील, सीए पांडुरंग नरेवाडकर, सीए पंकज मारीहाळ, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी.जी. पाटील, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर, शिक्षण संयोजिका नीला आपटे व शिक्षक समन्वयक सविता पवार उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या शिक्षण संयोजिका नीला आपटे यांनी केले. यानंतर जेष्ठ सीए आर.एन. हरगुडे यांच्या हस्ते सीए परीक्षा उत्तीर्ण झालेले माजी विद्यार्थी सीए पंकज मारीहाळ व सीए पांडुरंग नरेवाडकर यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर डॉ. शिवाजीदादा कागणीकर यांचा त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल व त्यांनी वयाच्या पंच्याहत्तरी पदार्पण केल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते शाल, भेटवस्तू, सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. सुभाष ओऊळकर यांनी अध्यक्ष मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी शाळेच्या विद्यार्थ्यांनी डॉ. शिवाजीदादा कागणीकर यांच्या जीवनकार्यावर आधारित ‘परिवर्तनाचा वाटसरू’ ही बाल एकांकिका सादर केली. या एकांकिकेचे लेखन शिक्षण संयोजिका नीला आपटे यांनी केले व दिग्दर्शन प्रसाद सावंत यांनी केले. लता नगरे, सहदेव कांबळे, नारायण गणाचारी यांनी नाटकाच्या यशस्वी सादरीकरणासाठी प्रयत्न केले.
संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नीला आपटे, माध्यमिक विभागाचे नारायण उडकेकर व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी.जी. पाटील, सविता पवार, धीरजसिंह राजपूत, शिक्षक, विद्यार्थी यांनी अथक परिश्रम घेतले. बक्षीस वितरणाचे सूत्रसंचालन गजानन सावंत तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका शैला पाटील यांनी केले. आभार शाळेतील संगणक विभाग प्रमुख श्रुती बेळगावकर यांनी केले.

About Belgaum Varta

Check Also

वडगाव विभागातील पारंपरिक श्री शिवजयंती भव्य मिरवणूक सोमवारी

Spread the love  पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांच्याशी मिरवणूकी संदर्भात चर्चा बेळगाव : वडगाव परिसरातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *