Monday , September 21 2026
Breaking News

कामकाजाकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय नाही

Spread the love

 

खासदार प्रियांका जारकीहोळी; अधिकाऱ्यांच्या बैठकीत सूचना

निपाणी(वार्ता) : शासकीय कामाच्या निमित्ताने अनेक नागरिक कार्यालयात येत असतात. त्यांच्या समस्या आणि तक्रारी जाणून घेऊन त्या तात्काळ सोडवण्यासाठी सर्वच अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत. त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा खासदार प्रियांका जारकीहोळी यांनी दिला. येथील शासकीय विश्रामधामात आयोजित तालुका पातळीवर अधिकाऱ्यांच्या बैठकीत त्या बोलत होत्या.
तहसीलदार सुरेश मुंजे यांनी स्वागत केले.
खासदार जारकीहोळी म्हणाल्या, आपल्या खात्याच्या अखत्यारित येणाऱ्या नागरिकांच्या शासकीय कामांची वेळेत पूर्तता करून नागरिकांना न्याय मिळवून द्यावा. शासकीय कामासाठी आलेल्या अर्जाचा निपटारा वेळेत व पारदर्शक पद्धतीने करावा. तालुका पातळीवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कामात तत्परता दाखवून कोणतेही काम प्रलंबित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. नागरिकांना शासकीय कामांसाठी अनावश्यक अडचणी येऊ नयेत, याकडे विशेष लक्ष द्यावे. शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या सर्व योजना व सवलतींची अंमलबजावणी करण्यासह नागरिकांना योजनांची माहिती देऊन लाभ मिळवून देण्याचे आवाहन त्यांनी केले.
बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांनीही अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत कामकाज अधिक प्रभावीपणे राबवण्याच्या सूचना दिल्या. तहसीलदार सुरेश मुंजे यांच्या हस्ते खासदार प्रियांका जारकीहोळी व लक्ष्मण चिंगळे यांचा प्रशासनाच्यावतीने सत्कार झाला. यावेळी तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी प्रवीण कट्टी, कार्यालयीन अधीक्षक सुदीप चौगुला, महिला व बालविकास विभागाच्या अधिकारी सुप्रिय जडगे, नगरपालिका आयुक्त गणपती पाटील, गटशिक्षणाधिकारी महादेव नाईक, सार्वजनिक बांधकाम खात्याचे व्ही. ए. भांडारकर, अग्निशामक दलाचे एस एन. नांगनुरे, गांधी रुग्णालयातील डॉ. संतोष गाणीगेर यांच्यासह तालुका पातळीवरील विविध खात्यांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *